Prabhakar  Pokharikar

Prabhakar Pokharikar

1936 - 2025
In loving memory of Prabhakar.
  • 88 years old
  • Born on Nov 30, 1936
  • Passed away on Feb 24, 2025
आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध गीतकार आणि गायक प्रभाकर पोखरीकर यांचे सोमवारी (२४ जुलै) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

८८ वर्षांच्या वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. "छाती ठोकून सांगू जगाला असा भीमराव होणार नाही" आणि "जीवाला जीवाचं दान माझ्या भीमाने केलं" यांसारखी अनेक लोकप्रिय गीते त्यांनी लिहिली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना पहिली संधी देणारे प्रभाकर पोखरीकर होते. त्यांनी अनेक नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. "जीवाला जीवाचं दान" या कॅसेटमध्ये सोनू निगमला गाण्याची संधी दिली होती. या कॅसेटमधील सर्व दहा गाणी पोखरीकर यांनी लिहिली, ज्यापैकी नऊ गाणी सोनू निगमने गायली होती.

या कॅसेटमधील "छाती ठोकून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही", "जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने" आणि "हे पाणी आणिले मी माठ भरूनी, हे घोटभर जाहो पिऊनी" ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. याच कॅसेटमुळे सोनू निगमचा आवाज संगीतसृष्टीला मिळाला.

प्रभाकर पोखरीकर दोनदा मृत्यूच्या दारातून परत आले होते. २६ जुलै रोजी मुसळधार पावसात भिजल्यामुळे ते गंभीर आजारी पडले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, मात्र बौद्ध भिक्खूंच्या सेवेमुळे ते मृत्यूच्या दारातून परत आले.

त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील एक प्रतिभावान गीतकार हरपला आहे.
Illustrate your loved one's story

Recent updates:

Kunal Share Life Story on Mar 1, 2025

Kunal Share Life Story on Mar 1, 2025
30 Views
Loading...