Bainabai Ramchand Khobragade

Bainabai Ramchand Khobragade

1910 - 2021
In loving memory of Bainabai.
  • 110 years old
  • Born on Aug 20, 1910
  • Passed away on Mar 11, 2021
#माझी आजी #श्रद्धांजलि#

आम्ही तीला मां म्हनायचो, आमच गांव "मसली" जि.नागपुर एक सुंदर निसर्गरम्य सानिध्यात "आम" नदी च्या किनारयावर वसलेले नदीच्या एका किनारयावर आमच घर तर दुसर्या किनार्यावर आमचे शेती ,शेतीला लागून घंनदाट जंगल तर त्याला लागून ऊंच ऊंच डोंगर, सगली कड़े हिरवगार रान अशा गावात जन्म झालेला माझी आजी. तोड़ात सोन्याचा चमच घेउ न जन्म झालेली आजी. वडीला कड़े ४०० एकर शेती, गांव ची जहांगीर दारी, तेंदू पत्ता चे जंगल ठेका आदी..

लग्न होऊंन आमच्या आज्या कड़े आली .. ऐन तारुन्यात वडीला चा मृत्यु झाला , भाऊ नसल्या मुले एक बहिनी सहीत संपूर्ण जबाबदारी
आजीवर आली आशातच आजोबा चा मृत्यु झालेला .. 10 ते 15 लोकांचा परिवार... मग एक स्त्री विशरून पुरुषा सारखी काम करनारी आजी. रात्रि शेतिची व 30एक गाई म्हसी ची राखन करनारी आजी. रात्रि शेताच राखन करित अस्ताना संपूर्ण शिवार भूत , लावड़ीं न भीतीने गावत आलेली पुरुष मण्डली तर आजी स्त्री आणि लहान मुलाचा आवाज ऐ कुन भूता कड़े हातात डंडा घेउण जानारी आजी.. मी लहान असताना रडुन रडून बेजार केल्या वर रात्रि डंडा व कंदील घेउन 20 कि. मि.जंगल पार करून माझ्या आई कड़े पोहचउन देनारी आजी.. गावात चौथी पर्यंतच शाला अशल्यामुले पुढ़िल शिक्षणा करिता माझ्या मामा कड़े मिर्ची, दाल, चना ,वांगी कपड़े इत्यादि वस्तु चे गाटोडे बाणधुन डोक्यावर घेऊन आम, कन्हना न, वैन गंगा नदी पार करून प्रवासाचे साधन नसल्यामुले 30 कि मि पैदल नेवुन देनारी आजी.. रस्त्यात मला भूख लागल्या वर गावात पहिल्या घरात " माझ्या नातवाला जेवन दे वो बाई " म्हणनारी माझी आजी.. माझा नातू ऐन जान करतू या म्हणून तिन्ही नदिच्या नावा ड याना वर्षाची दान देनारि आजी..

रस्त्यात मां तू बाबासाहेबाना बघीतल काय म्हणून विचार ल तर बाबासाहेब कसे होते , कश्या सभा होत, बोरकरानी बाबाना निवडनुकित कस पाडल सांगतानी रंगून जायची,मला म्हनाया ची तू खप शिक मोट्ठा हो,बाबा साहेब कसे शिकले अशी माझी आजी.. "सौ बहिनाबाई महारिन " या नावानी संपूर्ण पंच कोशित प्रसिद्ध होती कुठल्याही समाजातील भाडन तन टा असो आजीची हजेरी असयाची संपूर्ण समाज मग तो कुणबी, माली, तेली, ढीवर मांग या ठाकुर समाज असो तीचा मान होता असी आजी.. सपूर्ण जीवन हिम्मत, निडर पुरूषा सारखी जगत होती .. शेवटी वैंनगंगा नदीच्या "गोशे प्रकल्प" मुले सर्व जमीन घर गेल्यावर विस्थापित झालेली आजी .. वयाच्या 105 वर्ष दीर्घ प्रवासा नंतर काल (12/3/21) संध्या काली आम्हाला पोरक करून गेली..

????????आजी तुला तथागत शांति प्रदान करो ???????????????? हिच श्रद्धांजलि
आपले ऋणी.. संपूर्ण ##खोबरागडे परिवार##
Leave a Tribute
Laid a Wreath by Kunal on Jul 8, 2021
आजी तुला तथागत शांति प्रदान करो..
Illustrate your loved one's story

Recent updates:

Kunal Laid a Wreath on Jul 8, 2021

Kunal Create Memorial on Jul 8, 2021
110 Views
Loading...